Posts

Image
 
  पंडिता रमाबाई जीवन व कार्य  - लेफ्ट . डॉ . राज ताडेराव प्रास्ताविक            आधुनिक भारताच्या समाज सुधारणा चळवळीत पंडिता रमाबाई यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्या भारतातील सर्वात प्रभावशाली महिला सुधारकांपैकी एक असून सामाजिक कार्यकर्त्या आणि विद्वान म्हणून ओळखल्या जातात. देशाचा विकास हा स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून आहे हे ओळखून त्यांनी भारतीय विधवांच्या कल्याण आणि शिक्षणाला प्रोत्साहन दिले. स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. स्त्री सुधारणा चळवळी त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. ज्या काळात स्त्रीमुक्तीचा विचार करणेही अशक्य होते. त्या काळात स्त्रीमुक्तीचा मार्ग स्वतः अवलंबत शिक्षण, परदेश प्रवास आणि धर्मांतर असे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. अलौकिक सामाजिक कार्य, स्त्री शिक्षण व अध्यात्म या तीन गोष्टीचा वारसा रमाबाईंनी दिला. त्यांचे जीवन कार्य हे रूढी परंपरांना हादरे देणारे होते. अमुक एक क्षेत्र स्त्रियांची नाही, हे रमाबाईंना कधीच पटले नाही.     ...